हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Cards : सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होताच क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून ग्राहकांना अनेक ऑफर्स देण्यास सुरुवात होते. अनेक कंपन्या ग्राहकांना विविध प्रकारचे गिफ्ट्स, ऑफर्स आणि रिवॉर्ड्स देत आहेत. त्यामुळे ग्राहकांना खर्चातून काहीसा दिलासा मिळत असून त्यांना मनमोकळेपणाने खरेदी करता येत आहे. आज अशाच 5 क्रेडिट कार्डांबाबत माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे खरेदी करणे आणखी सोपे होईल.

Amazon Pay ICICI Credit Card – हे एक लाइफटाइम फ्री कार्ड आहे. यामध्ये प्राइम मेंबर्सना 5 टक्के कॅशबॅक तर नॉन-प्राइम मेंबर्सना 3 टक्के कॅशबॅक आणि 100 हून जास्त Amazon पार्टनर मर्चेंट्सद्वारे खरेदी करण्यावर 2% कॅशबॅक दिला जाईल. तसेच या कार्डद्वारे कॅशबॅकसाठी कोणतीही एक्सपायरी डेट नाही. Credit Cards

Flipkart Axis Bank Credit Card – Flipkart आणि Myntra वर या कार्डद्वारे केलेल्या प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध असेल. याशिवाय कुठेही खरेदी केल्यावर 4 टक्के कॅशबॅक मिळेल. या कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे. Credit Cards

HSBC Cashback Credit Card – Amazon वरून 1,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच वेलकम बेनिफिट म्हणून 500 रुपये किंमतीचे Amazon व्हाउचर, 3,000 रुपये किंमतीचे Ajio व्हाउचर आणि 1,500 रुपये किंमतीचे Myntra व्हाउचर मिळतील. Credit Cards

HDFC Millenia Credit Card – या कार्डद्वारे Amazon, Myntra, Flipkart वर खरेदी करताना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. यामध्ये कार्डधारकाने 1 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास त्याला 1,000 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर देखील मिळेल. या कार्डची वार्षिक फी 1,000 रुपये आहे. Credit Cards

SBI Simply CLICK Credit Card – या कार्डसाठी Amazon, BookMyShow, Lenskart आणि Cleartrip सोबत पार्टनरशिप आहे. यासोबतच मोठा कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स देखील मिळतील. या कार्डची वार्षिक फी 499 रुपये आहे. Credit Cards
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.paisabazaar.com/credit-card/credit-card-offers-in-india/
हे पण वाचा :
FD Rates : आता ‘ही’ बँक ग्राहकांना FD वर देणार जास्त व्याज !!!
OLA द्वारे घरबसल्या कमवा भरपूर पैसे, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया !!!
PNB Housing Finance कडून FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा




