हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात एकामागून एक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु केल्या जात आहेत. देशभरातील नागरिकांचा वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारत ट्रेन ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी इलेक्ट्रिक मल्टी-युनिट ट्रेन आहे. देशभरात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला मिळणारा वाढत प्रतिसाद पाहून देशात आता आणखीन पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहेत. आज आपण जाणून घेऊया या सर्व ट्रेन कोणकोणत्या राज्यातून जाणार आहेत आणि तिचा नेमका रूट कोणता आहे याबाबत….
या महिन्यात पहिली वंदे भारत ट्रेन हि हावडा ते पुरी स्थानकांदरम्यान चालवण्यात येणार आहे. हि ओडिसा राज्यात धावणारी पहिली अन दक्षिण भारतात धावणारी दुसरी वंदे भारत ट्रेन असणार आहे
दूसरी वंदे भारत ट्रेन जलपाईगुड़ी पासून गुवाहाटी रूट वर चालवण्यात येईल. हि नॉर्थेस्ट इंडिया पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन असेल.
त्यानंतर पाटणा आणि रांचीसाठी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्यात येईल.
हावड़ा-पुरी दरम्यान चालवण्यात येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या यशस्वी ट्रायलनंतर भुवनेश्वर ते हैदराबाद, पुरी ते रायपुर आणि पुरी हावड़ा लाइनवर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन जोडण्यात येईल.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा वेग हा जास्तीत जास्त 180 किमी प्रति तास इतका आहे. सध्या नवनवीन टेक्नोलॉजी वापरुन २०० किमी प्रति तास वेग असणाऱ्या ट्रेन ची तयार करण्यावर सरकार भर देत असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल व्यावसायिक वेग १६० किमी/तास (९९ मैल प्रति तास) आहे. रेल्वेमंत्र्यांच्या मते, वंदे भारत एक्स्प्रेसच्या दुसऱ्या आवृत्तीने केवळ ५२ सेकंदात ०-१०० किमी प्रति तास (०-६२ मैल प्रतितास) वेग वाढवला जाईल