हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : शेअर मार्केटद्वारे पैसे कमावण्यासाठी संयमाची गरज असते. तसेच शेअर मार्केटमध्ये चांगला नफा कमवण्यासाठी योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करणेही गरजेचे असते. मात्र, हे लक्षात घ्या कि, कोणत्याही कंपनीमध्ये पैसे गुंतवताना धोका नेहमीच असतो. तसेच, लहान कंपन्यांमध्ये हा धोका थोडा जास्त असतो तर मोठ्या कंपन्यांमध्ये तो तुलनेने कमी असतो. त्यासाठी आज आपण कमी वेळात भरपूर रिटर्न देणाऱ्या 5 शेअर्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
या लिस्टमध्ये आज पहिले नाव आहे इलेक्ट्रिक वस्तू बनवणाऱ्या हॅवेल्स इंडियाचे. या कंपनीच्या शेअर्सने वर्षांत गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. 2001 साली 1.89 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 1349 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. यादरम्यान या शेअर्समध्ये 714 पट वाढ झाली आहे. जर एखाद्याने त्यावेळी यामध्ये 14,000 रुपये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य सुमारे 1 कोटी रुपये झाले असते. Multibagger Stocks
आजच्या आपल्या या लिस्टमधील शेअर्समध्ये एचडीएफसी या खाजगी क्षेत्रातील बँकेचे नाव आहे. गेल्या 3 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना सुमारे 259 पट रिटर्न मिळवून दिला आहे. 1999 मध्ये 5.52 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 25802 टक्क्यांनी वाढून 1429.80 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. Multibagger Stocks
याबरोरबच आता वेअरहाऊस कंपनी असलेल्या फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक लिमिटेडने फक्त गेल्या साडेतीन वर्षांतच गुंतवणूकदारांना हजारो पट नफा मिळवून दिला आहे. लिस्टिंग वेळी अवघ्या 0.35 रुपयांवर असलेले हे शेअर्स आता सुमारे 147 रुपयांवर आले आहेत. त्यानुसार, या शेअर्सने 41,971.43 टक्के रिटर्न मिळवून दिला आहे. Multibagger Stocks
आपल्या आजच्या लिस्टमध्ये EP बायोकंपोजिट्स कंपनीचे नावआहे. गेल्या सलग 13 ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअर्सना अप्पर सर्किट मिळाले आहे. या कंपनीची इश्यू प्राईस 126 रुपये प्रति शेअर होती. आता यातील याची किंमत 346.95 रुपये झाली आहे. Multibagger Stocks
या मल्टीबॅगर शेअर्सच्या लिस्टमधील पुढचं नाव सोलर इंडस्ट्रीजच्या शेअर्सचं आहे. गेल्या 15 वर्षांत हे शेअर्स 20 रुपयांवरून 3,827 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या शेअर्सने गुंतवणूकदारांना 90 पटी पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. लिस्टिंग झाल्यापासून सातत्याने चांगला रिटर्न देत आहे. Multibagger Stocks
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.havells.com/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे दर तपासा
PNB च्या ‘या’ स्पेशल ऑफर अंर्तगत ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 6.60% रिटर्न !!!
IDFC First Bank च्या शेअर्सने एका दिवसात घेतली 10 टक्क्यांनी उसळी
FD Rates : कोणत्या बँकेकडून FD वर किती व्याज मिळत आहे ते पहा
WhatsApp द्वारे अशा प्रकारे पाठवता येतील 2 GB पर्यंतचे चित्रपट !!!