हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्याच्या काळात शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. अशातच जागतिक मंदीची चिंता, चलनवाढ आणि भू-राजकीय तणाव यांमुळे भारतीय शेअर बाजार देखील दबावाखाली आहे. मात्र ‘या’ अस्थिरततेच्या काळातही अनेक कंपन्यांचे शेअर्स हे मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. इतकेच नाही तर यातील काही शेअर्सनी या वर्षी गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देखील दिला आहे. तर आज आपण अशा काही फार्मा कंपन्यांच्या शेअर्स बाबत माहिती जाणून घेणार आहोत, जे मल्टीबॅगर स्टॉक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.’
Zim Laboratories : या स्मॉल कॅप कंपनीची मार्केट कॅप 347 कोटी रुपये आहे. 2022 मध्ये यामध्ये 84 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी तो 119 रुपयांवरून 214 रुपयांवर गेला आहे. 2022 वर्षामध्ये याकडे संभाव्य मल्टीबॅगर स्टॉक म्हणून पहिले जात आहे. Multibagger Stock
Syschem India : 2022 मध्ये या शेअर्समध्ये जोरदार वाढ होते आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये देखील या शेअर्सने मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. तसेच 2022 मध्ये यामध्ये आतापर्यंत 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या शेअर्सची किंमत 17.30 रुपये होती, जी आता वाढून 27.70 रुपये झाली आहे. Multibagger Stock
Lactose India : गेल्या एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 125 टक्के रिटर्न दिला आहे. 2022 मध्ये पुन्हा या स्टॉकने चांगलीच उडी घेतली आहे. या वर्षी आतापर्यंत यामध्ये 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022 च्या सुरुवातीला 39 रुपयांवर असलेल्या ‘या’ शेअर्सची किंमत आता 73 रुपये झाली आहे. Multibagger Stock
Parnax Labs : गेल्या एका वर्षात या शेअर्सने मल्टीबॅगर रिटर्न मिळवून दिला आहे. एका वर्षात त्यामध्ये 255% वाढ झाली आहे. तर 2022 मध्ये आतापर्यंत या शेअर्सने 50 टक्के रिटर्न दिला आहे. या कालावधीत हे शेअर्स 55 रुपयांवरून 84 रुपयांच्यावर पोहोचले आहेत. Multibagger Stock
Jagsonpal Pharmaceuticals : 2022 मध्ये आतापर्यंत हे शेअर्स 92 टक्क्यांनी वाढले आहेत. फेब्रुवारी 2022 पासून या शेअर्समध्ये सतत वाढ होत असून या वर्षापासून ते 170 रुपयांवरून 345 रुपयांवर पोहोचले आहेत. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jagsonpal.com/
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
Toyota RAV4 : TOYOTA ची RAV 4 भारतात लवकरच येणार; पहा फीचर्स आणि सर्वकाही
Gold Price Today : जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण, नवीन दर तपासा