रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झडती घेणारे 5 पोलीस निलंबित; मंत्र्याच्या तक्रारीनंतर कारवाई

0
90
raosaheb danave
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे झडती घेतल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तक्रार केली होती या तक्रारीनंतर मात्र पोलिसांनी कारवाई करत दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाचे झडती घेतल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतची कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी केली आहे. मात्र नेमक्या कोणत्या कारणासाठी दानवे यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली होती याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग रायसिंग सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल शाबान जलाल तडवी आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन उत्तमराव तिडके यांचा समावेश आहे.

यातून काय निष्पन्न झाले ? खुलासा करा …

पोलिस कर्मचाऱ्यांनी 11 जून रोजी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाचे झडती घेतल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कडून करण्यात आला. यावेळी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप देखील दानवे यांच्या कडून करण्यात आला आहे. झाडाझडती घेतल्यानंतर पोलिसांनी कार्यालयातील कामकाजाच्या संचिका देखील सोबत घेऊन गेले अशी माहिती दानवे यांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी दानवे यांच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे 14 जून रोजी संबंधित पाचही पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित झडतीतून नेमकं काय निष्पन्न झाला याचा खुलासा देखील करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here