भाजप नेत्याच्या कार्यक्रमाचे अमोल कोल्हेंच्या हस्ते उद्घाटन; दानवेंसोबत केली अर्धा तास चर्चा

Raosaheb Danve Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे पक्षातील अंतर्गत वादामुळे नाराज असून ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा केली जात आहे. अशात कोल्हे यांनी आता थेट भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या मुलाच्या फर्मचे उद्घाटन केले. इतकेच नाही तर त्यांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी सुमारे अर्धा तास गाडीत चर्चा केली असल्याने अनेक … Read more

‘जालना ते खामगाव रेल्वेसाठी विचार करू’- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

औरंगाबाद | जालन्यात साडेचार कोटी रुपये खर्चाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनची व्हायबेलेटी तपासून मार्गी लावण्यास सोबतच नांदेड ते मनमाड या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्यात आपले प्राधान्य राहील अशी घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी आयोजित कार्यक्रमात केली. ‘रेल्वेला … Read more

पुतण्याला वाचवायला जाऊन चुलत्याचाही बुडून मृत्यू

Drowned

जालना : पुतण्याला पाण्यात बुडताना पाहून चुलत्याने ही पाण्यात उडी घेतली. मात्र यावेळी दोघांनाही जीव गमवावा लागला. ही घटना जालना तालुक्यातील घाणेवाडी गावात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. परमेश्वर भानुदास खंडागळे, वय – 50, रोहित कृष्णा खंडागळे वय – 18 (दोघेही राहणार मांडवा) अशी मृतांची नावे आहेत. हाती आलेल्या माहितीनूसार, नेहमीप्रमाणे घाणेवाडी तलावाच्या मांडवा … Read more

दहा हजाराची लाच घेताना दोघेजण एसीबी पथकाच्या जाळ्यात

औरंगाबाद | जालन्यातील कर्मचाऱ्यांची औरंगाबादला बदली करण्यासाठी दहा हजारांची लाचेची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी एसीबीच्या पथकाने पाटबंधारे मंडळाच्या सहाय्यक अधीक्षक अभियंता व वरिष्ठ लिपिकावर शनिवारी कारवाई करण्यात आली. औरंगाबाद येथील रहिवासी असलेले सहाय्यक अधीक्षक अभियंता संजीवनी गर्जे (वय 57) आणि वरिष्ठ लिपिक मनसुब रामराव बावस्कर (वय 57) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे आणि लिपिकाचे नाव आहे. … Read more

ई-वेबिल न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यकर सहआयुक्त उतरले रस्त्यावर

Cheaking truk

औरंगाबाद | औरंगाबाद जालना रोडवर 9 जुलैपासून राज्यात जीएसटी कार्यालयातर्फे ई-वेबील विषयी कारवाई करण्यात येत आहे. करमाड टोल नाक्यावर गुरुवार पर्यंत 14 हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी 50 वाहनांकडे ई-वेबील नव्हते. यामुळे त्यांच्या कडून 60 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यकर जीएसटीचे सहआयुक्त आयएएस जी. श्रीकांत यांनी रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी करून कारवाई … Read more

व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर आत्महत्या करण्याची पोस्ट टाकत पोलीस कर्मचारी बेपत्ता

Suside

जालना : व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर मी आत्महत्या करत असल्याची माहिती देत एक पोलीस कर्मचारी गायब झाल्याची घटना घडली आहे. वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची पोस्ट या कर्मचाऱ्याने केली होती. या घटनेनंतर त्यांनी मोबाईल बंद करून ठेवल्यामुळे पोलिस दलात गोंधळ उडाला आहे. याप्रकरणी पोलिस या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहे. या सुसाईड नोट मध्ये त्या कर्मचाऱ्याने वरिष्ठ … Read more

मास्क का नाही लावले म्हणत सोन्याची बोरमाळ चोरट्याने केली पसार

Gold Stolen

परतूर | शनिवारी 26 जून रोजी सोन्याची बोरमाळ लुटल्याची घटना समोर आली आहे. शहरातील मोढा भागातील पोलिस चौकीजवळ हा प्रकार घडला आहे. दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये हा प्रकार शूट झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील पांगरा येथे वास्तव्यास असलेले एकनाथ पाटील लांडगे हे पत्नीची सोन्याची बोरमाळ गाठून घेण्यासाठी परतूर येथे आले होते. बोरमाळ गाठून झाल्यावर ते परत पंगारा … Read more

राज्यात ‘या’ जिल्ह्यांत होतोय कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’

मुंबई । कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा ‘ड्राय रन’ (Dry Run) म्हणजेच रंगीत तालीम आज (शनिवारी) पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या ४ जिल्ह्यातील प्रत्येकी ३ आरोग्य केंद्रांवर होणार असून, प्रत्येक केंद्रांवर २५ जणांना त्यासाठी निवडण्यात आले आहे. त्यामध्ये केवळ प्रत्यक्ष लस न टोचता लसीकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. केंद्राकडून देशात’ सिरम’च्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन … Read more

मराठवाड्यात कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट

Cotton Plant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। यावर्षी मराठवाड्यात दर वर्षीच्या तुलनेत कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  साधारण १५ लाख ९४ हजार ३०१ हेक्टर क्षेत्र असताना केवळ १४ लाख ६२ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. एकूण १ लाख ३१ हजार म्हणजे जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली नाही. एकूण केवळ ९२ टक्के क्षेत्रावरच लागवड झाली … Read more