नवी दिल्ली । जर आपलेही बँकेत बचत खाते (Savings Account) असेल बँकेकडून त्यात जमा असलेल्या रकमेवर व्याज दिले जाते. अलिकडच्या वर्षांत बचत खात्यांवरील व्याजदरात बरीच कपात झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात बचत खात्यावरील व्याज बर्यापैकी कमी झाले आहे. तथापि, या काळातही काही बँकांचे व्याजदर चांगले आहेत. सध्याच्या काळात बचत खात्यांवरील सर्वाधिक व्याज सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँक आणि कॅनरा बँकेद्वारे दिले जात आहे.
कॅनरा आणि आयडीबीआय बँकेतील बचत खात्यावर मिळते सर्वाधिक व्याज
बँक बाजार डॉट कॉमच्या आकडेवारीनुसार आयडीबीआय बँक आणि कॅनरा बँक सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका बचत खात्यांवर अनुक्रमे 3.5 टक्के आणि 3.5 टक्के व्याज दर देतात. हे व्याज दर खासगी बँकांच्या तुलनेत स्पर्धात्मक आहेत. उदाहरणार्थ, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक 3 – 3.5 टक्के व्याज आणि कोटक महिंद्रा बँक 3.5 टक्के ते 4 टक्के व्याज देतात. अलीकडेच कॅनरा बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याज दरात वाढ करण्याची घोषणा केली.
भारतीय स्टेट बँक टॉप 10 बँकांच्या लिस्ट मध्ये नाहीत
तथापि, सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँका त्यांच्या बचत खातेधारकांना कमी व्याज देतात. उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) अनुक्रमे 2.70 टक्के आणि 2.75 टक्के व्याज देतात. टॉप 10 व्याज दर देणाऱ्या बँकांच्या यादीमध्ये बँक ऑफ बडोदा सर्वात खाली आहे. विशेष म्हणजे एसबीआय या लिस्टमध्ये नाही.
स्मॉल फायनान्स बँका 7% व्याज दर देत आहेत
स्मॉल फायनान्स बॅंकांनी बचत खाते धारकांना दिलेले व्याज दर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा जास्त आहेत. उदाहरणार्थ, एयू स्मॉल फायनान्स बँक आणि उज्जिवान स्मॉल फायनान्स बँक अनुक्रमे 7 टक्के आणि 6.5 टक्के व्याज दर देत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.