देशात महाराष्ट्राचा कारभार नंबर वन !! उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यामुळे देशभरातून बाळासाहेबांना मानवंदना देण्यात येत आहे .बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसैनिक व नेत्यांची रीघ लागली आहे. यावेळी संजय राऊत यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

संजय राऊत म्हणाले, आज बाळासाहेबांचा आमच्यासाठी जन्मदिवस असून आजही बाळासाहेब आमच्या सोब आहेत. आज जे काही महाराष्ट्राचे, शिवसेनेचं, महाविकास आघाडीचं चाललं आहे त्यामागे बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे आणि तो कायम असणार आहे, अशा भावना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.

बाळासाहेबांनी जे काही पुण्य केलं त्या पुण्याईवर महाराष्ट्र आणि मराठी माणूस टिकून आहे. याबाबत आम्हाला आनंद आहे,’ असं नमूद करतानाच ‘आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत. देशात राज्याचा कारभार नंबर वन आहे. उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. नक्कीच बाळासाहेब जिथं कुठं असतील तिथून ते आनंदात दोन्ही हातांनी आम्हाला आशीर्वाद देत असतील,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like