सोशल मिडियावर विवादित पोस्ट टाकल्यानंतर होणार 5 वर्षाची शिक्षा ! ‘या’ व्हायरल पोस्टमागील सत्य जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कोड ऑफ एथिक्स आणि रेगुलेशन बनवले आहे. यामध्ये सरकारने असे म्हटले होते की, मीडिया सोबतच, कोणालाही अफवा आणि खोट्या बातम्या पसरण्याचा अधिकार नाही. जर नियमांचे पालन झाले नाही तर त्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात येईल. कोड ऑफ इथिक्स समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक फेक मेसेजेस पहायला मिळत आहेत. यामध्ये, ‘सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानंतरपाच वर्षाची शिक्षा होणार आहे.’ असा मेसेज व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर विवादित पोस्ट टाकल्यानंतर 5 वर्ष शिक्षा होणार असे पोस्टचे स्क्रीन शॉट आणि न्यूज चॅनेलचे एडीट केलेले फोटो सोशल मीडियावरती फिरत आहेत. हा व्हायरल मेसेज एका वृत्तपत्राची हेडलाईन आहे. त्यानंतर PIB या वेबसाइटने अधिकृत माहिती दिली. या माहितीमध्ये आपल्यामध्ये विवादीत पोस्ट टाकल्यानंतर पाच वर्षाची शिक्षा होणार हे खोटे सांगितले आहे.

यासोबतच पीआयबी ने त्याच्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, ‘देशाची अखंडता, सार्वभौमता, राज्याची सुरक्षितता, विदेशांत सोबत मैत्रीपूर्ण संबंध आणि अन्य माहितीपूर्ण विषयांवरती विवादीत सामग्रीसाठी हे प्रावधान बनवले आहे. तसेच, कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न नसल्याचेही PIB आपल्या वेबसाईटवर सांगत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.