आजपासून महिलांना ST प्रवासात 50% सवलत; शासन आदेश जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. आजपासून महिलांना ST प्रवासात 50% सवलत मिळणार आहे. त्याबाबतचा शासनाचा आदेश जारी झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना ST प्रवासात 50% सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला होता. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस म्हणजे, साधी बस, मिडी, मिनी, निमआराम बस, विनावातानुकुलीत शयन-आसनी बस, शिवशाही (आसनी), शिवसेनेरी, शिवाई (साधी आणि वातानुकुलीत) या बसमध्ये आजपासून 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. तसेच यापुढे ज्या नवीन गाड्या उपलब्ध होतील, त्यामध्ये महिलांना ही सवलत मिळणार आहे. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.

 

यापूर्वी राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. आता महिलांना सुद्धा प्रवासादरम्यान तिकीट दरात सरसकट 50 टक्के सवलत मिळणार आहे.