लंडन । ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग (Covid Pandemic) वाढत आहे. येथे लसीकरण केलेल्या प्रौढांमधील कोरोना संसर्गाची प्रकरणे खूप वेगाने वाढत आहे. किंग्ज कॉलेज लंडन येथील वरिष्ठ व्हायरस ट्रॅकिंग स्पेशलिस्ट, यूके प्रो. टिम स्पेक्टर म्हणाले की,” ब्रिटनमधील कोरोना साथीच्या रोगाची तिसरी लाट शिगेला पोहोचली आहे. येथे एकूण 87.2 टक्के संक्रमित लोकं अशी आहेत ज्यांना लस दिली गेली आहे. अशा परिस्थितीत 19 जुलैपासून ब्रिटनमध्ये पूर्णपणे अनलॉक करणे योग्य आहे का, हा मोठा प्रश्न आहे.”
6 जुलै रोजी, लसीकरण झालेल्या 12905 लोकांमध्ये व्हायरसची पुष्टी झाली. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, 6 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्यांपैकी 50 टक्के रुग्णांनी लसीकरण केल्याचे आढळले. प्रोफेसर स्पेक्टरच्या अंदाजानुसार येत्या काळात हा आलेख आणखी वाढू शकेल. खरं तर, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी पुन्हा सांगितले की,”इंग्लंडमधील कोरोना विषाणूशी संबंधित सर्व निर्बंध19 जुलै रोजी संपतील.” NHK वर्ल्डच्या रिपोर्टनुसार जॉन्सन यांनी पत्रकारांना सांगितले की,” यापुढे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार नाही.”
लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि वैयक्तिक जबाबदारीने वागण्याचे आवाहन करीत पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले की,” हा साथीचा आजार अजून संपलेला नाही.” ते पुढे म्हणाले कि, “सोमवार, 19 जुलैपासून आपण जुन्या नॉर्मल लाइफमध्ये लगेच परतू शकत नाही.” अधिकाऱ्यांनी सांगितले की, गर्दी होत असलेल्या इनडोअर भागात लोकांनी चेहरा झाकून घ्यावा अशी सरकारची अपेक्षा आहे.
सरकारच्या निर्णयाच्या दरम्यान, काही तज्ञांनी असा इशारा दिला आहे की, जेव्हा विषाणूचा प्रसार होतो आहे तेव्हा निर्बंध हटविणे धोकादायक होईल. NHK वर्ल्डने सांगितले कि, डेल्टा व्हेरिएंटच्या प्रसारादरम्यान, अलिकडच्या काळात ब्रिटनमधील दैनंदिन प्रकरणे 30 हजारांच्या वर आली आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group