अर्थव्यवस्था सशक्त रहावी म्हणून ५० हजार कोटींचा भरणा करणार – शक्तीकांत दास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशवासीयांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेतली. देश आणि संपुर्ण जगच कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्नशील असताना अर्थव्यवस्थेत ५० हजार कोटी रुपयांची भर घालण्याचा विचार असल्याचं शक्तीकांत दास यांनी आज स्पष्ट केलं. LTRO च्या माध्यमातून हे पैसे देशाच्या तिजोरीत टाकण्यात येतील. जपान, जर्मनीसह अमेरिकेची अर्थव्यवस्थाही सध्या डबघाईला आली असून अमेरिकेला तब्बल 9 ट्रीलियन डॉलरचा फटका बसल्याचं शक्तीकांत दास यांनी सांगितलं.

दरम्यान रिव्हर्स रेपो रेटमध्ये आणखी ०.२५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय दास यांनी आज जाहीर केला. चालू रिव्हर्स रेपो रेट आता ३.७५% झाला आहे. रेपो दर मात्र आहे असाच ठेवण्यात आला आहे. भारताकडे सध्या ७ महिने पुरेल एवढं परकीय चलन शिल्लक असून जागतिक प्रयत्नांच्या आधारे भारताचा येत्या वर्षातील विकासदर ७.४% पर्यंत जाईल असा विश्वासही दास यांनी व्यक्त केला. गव्हर्नरांच्या या निर्णयामुळे गृह, वाहन कर्जे स्वस्त होणार आहेत.

देशातील डिजिटल पेमेंटमध्ये होणारी वाढ सकारात्मक असून यात वाढ होणं हे अर्थव्यवस्थेसाठी गरजेचं असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सुरु असून लॉकडाऊन हटल्यानंतर औद्योगिक क्षेत्राला मजबुती देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असही दास यावेळी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०२ वर, दिवसभरात २८६ नवे रुग्ण

२० एप्रिलनंतर टाळेबंदीत शिथिलता? पहा काय म्हणतायत राजेश टोपे

सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य

राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांना ‘ही’ महत्त्वाची सूचना; म्हणाले..

खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी सुरू केला तपास

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा -www.hellomaharashtra.in

Leave a Comment