धक्कादायक! देशात केवळ ५ दिवसात कोरोनाचे ५० हजार रुग्ण वाढले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एकीकडे संपूर्ण देश अनलॉक होत असताना दुसरेकडे देशातील कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रत्येक नवीन दिवसासह कोरोनाचे आकडे वाढतच आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाची 9983 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच लाखाच्या वर गेली आहे. चिंतेची बाब म्हणजे फक्त 5 दिवसात जवळपास 50 हजार नवीन रुग्ण वाढले आहेत.

मागील ५ दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास 3 जून रोजी देशात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 615 होती. 4 जून रोजी कोरोना रुग्णांची संख्या 2.16 लाखांवर गेली. 5 जून रोजी रूग्णांची संख्या वाढून 2.26 लाख झाली. 6 जून रोजी रुग्ण संख्या 2.36 लाखांवर पोहोचली. 7 जून रोजी रुग्ण सख्या 2.46 लाख झाली. तर 8 जून रोजी देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 56 हजार 611 झाली आहे. म्हणजेच देशात दररोज सुमारे 10 हजार नवीन रुग्ण देशात वाढत आहे.

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी सापडला होता. 7 मे रोजी कोरोना रूग्णांची संख्या 50 हजारांवर गेली होती. म्हणजेच, सुमारे 96 दिवसांत प्रथम 50 हजार रुग्ण आढळले. १ मे रोजी रुग्णांची संख्या १ लाखांवर गेली होती. 27 मे रोजी रुग्णांची संख्या 1.50 लाखांवर पोहोचली आणि 3 मे रोजी ती 2 लाखांच्या वर गेली. आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 56 हजार 611 आहे. आतापर्यंत 7 हजार 135 लोकांचा बळी गेला असून 1 लाख 24 हजार 95 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आता 1 लाख 25 हजार 381 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. येथे एकूण रुग्णांची संख्या 89 हजार 975 वर गेली असून आतापर्यत 3060 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”