हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकरी, गरीब जनता आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. त्याच धर्तीवर आता देशातील गरोदर महिलांसाठी पंतप्रधान मातृ वंदना योजना सुरु करण्यात आली असून या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना दरवर्षी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. गरोदर आणि स्तनदा महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत व्हावी, त्यांचा वैद्यकीय उपचार आणि औषध खर्च कमी व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
3 हप्त्यांमध्ये मिळतात पैसे –
पीएम मातृ वंदना योजनेअंतर्गत, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5,000 रुपये रोख मिळतात. हे पैसे वर्षातून 3 हप्त्यांमध्ये महिलांच्या खात्यावर DBT द्वारे पाठवले जातात . यामध्ये रजिस्ट्रेशनवेळी 1,000 चा पहिला हप्ता दिला जातो, 6 महिन्यांनी किंवा पहिल्या तपासणीनंतर 2,000 रुपयेंचा दुसरा हप्ता आणि बाळाच्या जन्माच्या नोंदणीनंतर 2,000 रुपयांचा तिसरा आणि शेवटचा हप्ता मिळतो.
कोणत्या महिलांना मिळतील पैसे –
ज्या महिला रोजगार करून आपलं दैनंदिन जीवन जगत आहेत अशा महिलांनाच या योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ होणार आहे. गर्भधारणेदरम्यान मजूर काम करणं सोप्प नसत. त्यामुळे अनेक महिलांचे हाल होतात. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन अशा महिलांचे आर्थिक नुकसान होऊन द्यायचे नाही आणि महिलांना चांगल्या उपचार सुविधा उपलब्ध करूनदेणे हेच या योजनेचं उद्दिष्ट आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही उपक्रमाशी संबंधित असलेल्या महिलांना सरकार या योजनेचा लाभ मिळत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर पहिले मूल जिवंत असेल तरच या योजनेचा लाभ मिळतोय.