व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारच अध्यक्ष? राष्ट्रवादीच्या गोटातून सर्वात मोठी बातमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. तसेच शरद पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहावं असा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात करण्यात आला . पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. तसेच निवड समितीचा हा प्रस्ताव घेऊन आपण शरद पवार यांच्याकडे जाणार आहोत असेही त्यांनी सांगितलं.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवारांनी आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतला. ते निवृत्तीची घोषणा करतील अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. आज संपूर्ण देशात शरद पवार सन्मानित नेते आहेत. महारष्ट्रासह संपूर्ण देशाला त्यांची गरज आहे. पवार साहेबांच्या राजकीय अनुभवाचा राष्ट्रीय पातळीवर फायदा होतो त्यामुळे देशातील अनेक मान्यवरांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, किंवा मला फोन केला असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तीव्र भावना आपल्याला पाहायला मिळाली. या कार्यकर्त्यांच्या मनात दुःख आहे, त्यांच्या भावना आम्ही नजरअंदाज करू शकत नाही. त्यामुळे आजच्या निवड समितीच्या बैठकीत शरद पवार हेच अध्यक्ष राहतील असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. पवार साहेबानी आमच्या आणि देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपला निर्णय मागे घ्यावा असे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केलं.