सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सध्या साताऱ्यात चर्चेत असणारी ग्रामपंचायत लवकरच नगरपंचायत होणार आहे. तत्पूर्वी पूर्वनियोजित ग्रामपंचायत निवडूणुकीचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 17 जागेसाठी 56 अर्ज दाखल झाले आहेत. तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी 4 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे खेड ग्रामपंचायतीत चांगलीच चुरस वाढल्याचे पहायला मिळत आहे.
खेड ग्रामपंचायत यामध्ये शिवसेनेचे आ. महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे माजी आ. शशिकांत शिंदे यांच्या गटात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. खेड ग्रामपंचायतीवर दबदबा कोणाचा असणार हे निकालनंतर कळेल. या निकालावर भविष्यात होणाऱ्या नगरपंचायतीवर त्यांची सत्ता असणार हेही निश्चित होईल. खेडमधील नागरिक कोणाबरोबर असणार हे येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे.
युवकांचा स्वतंत्र लढण्याचा निर्णय ः- विकासनगर व प्रतापसिंहनगर या ठिकाणचा बराच भागाचा विकास गेल्या 20 वर्षात झालेला नाही. यामुळे तेथील काही युवा वर्गाने पक्ष विरहित निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. आजी- माजी आमदारांच्या समवेत निवडणूक न लढवण्याचा निर्धार त्यांनी करून स्वतः निवडणूक लढवून विकास कामांचा झेंडा रोवायचा निर्धार या युवकांनी केला आहे.