‘या’ तारखेपासून कारमध्ये 6 एअरबॅग बंधनकारक; गडकरींची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचे सांगितले होते. 1 ऑक्टोबर 2022 पासून त्याची अंमलबजावणी होणार होती, परंतु सध्या केंद्र सरकारने ही तारीख 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. जागतिक पुरवठा साखळीतील समस्या लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे.

गडकरी यांनी ट्विट करत म्हंटल की, ऑटो इंडस्ट्रीला सध्या मागणी -पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या अडचणींमुळे ऑटो इंडस्ट्रीवर परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊन M1 श्रेणीतील वाहनांमध्ये सहा एअरबॅगच्या अंमलबजावणी पुढील वर्षीपासून करण्यात येणार आहे.

दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये एअरबॅग्ज असण खूप गरजेचं आहे. या एअरबॅग्सला सिलिकॉन कोटिंग असते. सोडियम अझाइड वायूचा वापर एअरबॅग फुगवण्यासाठी केला जातो. कारचा अपघात होताच एअरबॅग्स उघडतात आणि प्रवाशांचे संरक्षण करतात. त्यामुळे दुखापतीची तीव्रता कमी होते.