दोन विमानांची हवेतच झाली धडक, थरकाप उडवणारा Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एअर शोदरम्यान हा अपघात झाला आहे. यात डलासमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील दोन युद्ध विमाने हवेत एकमेकांवर (two planes collide) आदळली. हा अपघात (two planes collide) इतका भीषण होता की, टक्कर होताच एका विमानाचे मधूनच दोन तुकडे झाले. तर दुसरं विमान पूर्णपणे जळून खाक (two planes collide) झाले.

या भीषण दुर्घटनेत पायलट आणि क्रू मेंबर्ससह 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, शनिवारी अमेरिकेतील डलास येथे या अपघातात दुसऱ्या महायुद्धात वापरले गेलेले विमान कोसळले आहेत. एअर शो पाहण्यासाठी याठिकाणी अनेक लोक उपस्थित होते. एअर शो सुरू असतानाच बोईंग बी-17 फ्लाइंग फोर्ट्रेस आणि बेल पी-63 किंगकोब्रा फाईटर या विमानांची जोरदार धडक झाली. डलास एक्झिक्युटिव्ह विमानतळाजवळ हा अपघात झाला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, FAA आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB) ने तपास सुरू केला आहे. डॅलसच्या महापौरांनी ट्विट केले, ‘तुमच्यापैकी अनेकांनी च्या शहरात एअर शो दरम्यान (two planes collide) एक दुःखद घटना पाहिली आहे. सध्या संपूर्ण माहिती प्राप्त झालेली नाही किंवा मिळालेल्या माहितीची पुष्टी झालेली नाही. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने अपघाताची कमान हाती घेतली आहे. डॅलस पोलिस विभाग आणि डॅलस फायर रेस्क्यू यांच्याकडून मदत केली जात आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!