हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Boy Died पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेत सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. युवान दौंडकर असे मृत्यू झालेल्या मुलाच नाव आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. युवानची आई वॉशिंग सेंटरवर गाडी धुण्यासाठी आली. तेव्हा शेजारीच असलेल्या गीता स्टील अँड फॅब्रिकेशनच्या दुकानात बसल्या असताना युवान अचानक लोखंडी रॉडवर ठेवलेली ग्रँडर मशीन सोबत झोका असताना मशीन थेट युवानच्या तोंडावर पडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या मशीनचे वजन 20 ते 30 किलो असल्याचे दुकानातील कामगारांनी सांगितलं आहे.
काय घडले नेमके ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवान दौंडकर हा सहा वर्षीय मुलगा त्याच्या आईसह वॉशिंग सेंटरवर आला होता. आई शेजारी असलेल्या गीता स्टील अँड फॅब्रिकेशनच्या दुकानात खुर्चीवर होती, युवान तिथेच त्यांच्या समोर खेळत होता. तेव्हा लोखंडी रॉडवर ठेवलेल्या मोठ्या ग्रँडर मशीनला झोका घेण्याच्या प्रयत्न करत असताना ती मशीन युवानच्या तोंडावर पडली. Boy Died
मशीन हे थेट युवानच्या तोंडावर पडले, काही कळायच्या आत घटना घडल्याने युवानला बेशुद्ध अवस्थेत आईने उचलले तात्काळ रुग्णालयात नेले त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळं दौंडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निष्काळजीपणा केल्या प्रकरणी दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांच्याकडून देण्यात आली आहे. Boy Died
हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये 4 वर्ष प्रीमियम भरून मिळवा लाखो रुपये !!!
Car Loan : सेकंड हँड कारसाठी कर्ज कसे मिळवावे ते जाणून घ्या
Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा पैसे दुप्पट !!!
Credit Card द्वारे खरेदी करताना कोणत्या गोष्टींचे बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करता येत नाही तेजाणून घ्या
Bank of Baroda ने चेक पेमेंटच्या नियमांमध्ये केले महत्वाचे बदल, चेक देण्यापूर्वी जाणून घ्या