कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होत असला तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कोयना, नवजा व महाबळेश्वर येथे पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात चांगली वाढ झाली आहे. आज (बुधवारी) दि. 20 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणात सध्या 60.20 टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
#कोयना धरणाची दैनंदिन पाणी पातळी pic.twitter.com/e0PfwdP24U
— DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) July 20, 2022
सातारा जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून चांगला पाऊस पडलेला आहे. परिणामी धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. चोवीस तासात कोयनानगर येथे 19 मिलीमीटर, नवजा येथे 43 मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे 28 मिलीमीटीर पावसाची नोंद झाली आहे.
#सातारा जिल्ह्यातील नदी पातळी अहवाल pic.twitter.com/WiCWb0JNDQ
— DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) July 20, 2022
पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 16 हजार 512 क्युसेक झाली आहे. धरणाची जलपातळी 2118 फुट झाली असून धरणात 60.20 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.