लॉकडाऊनपासून आतापर्यंत राज्यात 60 हजार गुन्हे दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात तब्बल ६० हजार गुन्हे दाखल झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून म्हणजे 22 मार्च ते आजच्या ४ वाजेपर्यंत राज्यात कलम 188 नुसार 60,005 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 13 हजार 381 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. याचबरोबर तब्बल 41 हजार 768 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 75 हजार 115 फोन कॉल नोंदवले गेले आहेत. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली असल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा 589 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1 हजार062 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 30 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

दुर्दैवाने लॉकडाउनच्या कालावधीत पोलिसांवर लोकांवर कारवाई करतेवेळी हल्ला होण्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. आतापर्यंत अशा 121 घटनांची नोंद झाली असून यात 411 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विनाकारण, बाहेर फिरणाऱ्या अशा लोक कोरोनाच्या संकटापासून दूर राहावेत म्हणून पोलीस कर्मचारी बाहेर तैनात आहेत. मात्र, त्यांच्यावरच हल्ले होत असेल तर कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”.