देशभरात मागील २४ तासांत ६४,५५३ कोरोनाचे नवे रुग्ण; १००७ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत असून दररोज ६० हजारांच्यापुढे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत ६४ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १००७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना रुंगांच्या वाढत्या संख्येनुसार देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २४ लाख ६१ हजार १९१ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत देशात ४८ हजार ४० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मागील २४ तासांमध्ये देशात १००७ रुग्ण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांचीही विक्रमी नोंद होत आहे. मागील २४ तासांमध्ये ५६ हजार ३८३ रुग्ण बरे झाले. हे प्रमाण ७०.७६ टक्क्यांवर पोहोचले असून सुमारे १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर ६ लाख ६१ हजार ५९५ रुग्ण उपचार घेत आहेत.

याशिवाय देशातील कोरोना मृत्यू दर २ टक्क्यांपेक्षाही कमी १.९६ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी दिवसभरात ८ लाख ४८ हजार ७२८ जणांच्या चाचण्या केल्या गेल्या. एकूण २.७६ कोटी चाचण्या झाल्या असून १० लाख लोकसंख्येमागे १९ हजार ४५३ चाचण्या केल्या जात आहेत. या आठवड्यात प्रति दिवस ६ लाखांपेक्षा जास्त चाचण्या केल्या गेल्या आहेत

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment