Sunday, March 26, 2023

देशात गेल्या २४ तासांत नव्या ६६,९९९ कोरोनाबाधितांची नोंद; ९४२ जणांचा मृत्यू

- Advertisement -

नवी दिल्ली । देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाही आहे. भारतात मागील काही दिवसांपासून दररोज 60 हजार किंवा त्यापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासांत देशात ६६ हजार ९९९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर ९४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दिवसागणिक देशात करोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या देशात सहा लाख ५३ हजार ४२२ जणांवर उपचार सुरु आहेत. याच्या दुपटीपेक्षा जास्त रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत १६ लाख ९५ हजार ९८२ जणांनी करोनावर मात केली आहे.देशात आतापर्यंत ४७ हजार ३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”