नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब ठरत आहे. मागील 24 तासात देशात 1 लाख 26 हजार 789 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या फोफावणाऱ्या कोरोनाला रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. तसेच कोरोनामुळे मागील 24 तासात देशात 685 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे .कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगानं देशभरात पसरत आहे.
दरम्यान मागील 24 तासात देशभरात 59 हजार 258 रुग्णांना कोरोनावर उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे देशात एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 18 लाख 51 हजार 393 इतकी झाली आहे. नव्याने वाढलेल्या कोरोना बाधित रुग्णांमुळे आतापर्यंत देशातील करोना रुग्णांची संख्या 1 कोटी 29 लाख 28 हजार 574 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात कोरोना मुळे 1 लाख 66 हजार 882 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान सध्या देशात 9 लाख दहा हजार 319 जणांवर उपचार सुरू आहेत.
India reports 1,26,789 new #COVID19 cases, 59,258 discharges, and 685 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,29,28,574
Total recoveries: 1,18,51,393
Active cases: 9,10,319
Death toll: 1,66,862Total vaccination: 9,01,98,673 pic.twitter.com/EDiGfB5kA3
— ANI (@ANI) April 8, 2021
कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता देशात लसीकरणाची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून आतापर्यंत देशात लसीकरणाने नऊ कोटी एक लाख 98 हजार 673 इतका टप्पा ओलांडला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group