ओ परिवार मंत्री शपथ काय घेता,राजीनामा द्या – नितेश राणे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनआयएच्या चौकशीखाली असलेल्या सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब नंतर राज्यात अजून एक खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांच्या सोबत शिवसेना नेते अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसूल करायला सांगितली, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टापुढे सादर केलेल्या पत्रातून केला आहे. अनिल परब यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान भाजपने मात्र परब यांच्यावर निशाणा साधला.

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. ओ परिवार मंत्री.. शपथ काय घेता.. शेंबूड पुसा.. राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा.. पुरावे तयार आहेत.. आता वस्त्रहरण अटळ आहे, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी ट्विटरवरून केला आहे.

अनिल परब नक्की काय म्हणाले-

दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवस आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. मी कधीही वाझेंना अशा प्रकारच्या वसुलीचे आदेश दिले नव्हते, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like