२३ जूनला परतू शकतात पाकिस्तानात अडकलेले ६९३ भारतीय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे पाकिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये अडकलेले ६९३ भारतीय नागरिक हे २३ जून रोजी भारतात परत येऊ शकतात. त्यासाठीची औपचारिकता ही नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. इस्लामाबादमधील भारतीय दूतावास या नागरिकांच्या सतत संपर्कात आहेत, असे एथिल उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. त्यातील बहुतेक काश्मिरी विद्यार्थी आहेत, तर पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही लोकही पाकमध्ये सहलीला गेले होते आणि लॉकडाऊनमुळे तेथे अडकले.

सूत्रांनी सांगितले की ते हवाई मार्गाने नाही,तर वाघा-अटारी सीमेवरुन परत येतील. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी मार्चमध्ये भारत-पाक सीमेला सील करण्यात आले होते, तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर देखील बंदी घालण्यात आलेली होती. त्यानंतर हे भारतीय नागरिक पाकिस्तानात अडकले. आपली ओळख लपवून ठेवण्याच्या विनंतीसह एका काश्मिरी विद्यार्थ्याने न्यूज चॅनेलला सांगितले की, तिला ईमेलद्वारे भारतीय उच्चायुक्तांकडून आपल्या मायदेशी जाण्यासंबंधीची चांगली बातमी मिळाली. त्या ईमेलमध्ये असे लिहिले आहे की, इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी येथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

भारतीय उच्च आयोगाच्या ईमेलवरून मिळाली चांगली बातमी
ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तान सरकारला २३ जून रोजी पाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी वाघा सीमा खुली करण्याची विनंती केलेली आहे. पण हातात ते पाकिस्तान सरकारच्या उत्तराची वाट पहात आहे. या ई-मेलमध्ये असे म्हटले आहे की, सर्व भारतीयांनी आपल्या देशात परत येण्यासाठी योग्य ती व्यवस्था केली पाहिजे, भारतात परत आल्यावर त्यांना पंजाबमध्ये १४ दिवसांच्या क्वारंटाइन राहावे लागेल.

पाकिस्तान उच्च आयोगातील सूत्रांनी न्यूज चॅनेलला सांगितले की, या संदर्भात भारताकडून त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. तसेच, पाकिस्तान सरकार सध्या यावर विचार करीत आहे, परंतु अद्याप याची तारीख निश्चित झालेली नाही.

भारतात अडकलेले पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत
लॉकडाऊन असूनही भारताने पाकिस्तानच्या नागरिकांना मदतीचा हात दिला. दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या लॉकडाऊन दरम्यान ४३० हून अधिक पाकिस्तानी नागरिक आपल्या मायदेशी परतले आहेत. त्यांना अटारी-वाघा सीमेवरुन पाकिस्तानात जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment