गेल्या २४ तासांत देशात विक्रमी ६९ हजार ८७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूचा कहर अजूनही कायम आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोनाबाधितांची संख्या सध्या वैद्यकीय यंत्रणा आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. मागील २४ तासात देशात विक्रमी ६९ हजार ८७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या विळख्यातून बाहर येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २९ लाख ७५ हजार ७०२ इतकी झाली आहे. त्यापैकी ६ लाख ९७ हजार ३३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत २२ लाख २२ हजार ५७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ५५ हजार ७९४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, दररोज आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा ६० हजारापर्यंत मर्यादित होता. मात्र, काल आणि आज नव्या रुग्णांच्या आकड्याने पुन्हा एकदा ६५ हजारांची वेस ओलांडली आहे.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५० वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ४ लाख ७० हजार ८७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार ५६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”