भारतातील 10 पैकी 7 महिला सोडत आहेत नोकरी, काय असेल यामागील कारण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । वेतन कपात, पक्षपातीपणा आणि लवचिकतेचा अभाव यामुळे भारतातील महिला या वर्षी मोठ्या संख्येने नोकरी सोडत आहेत किंवा सोडण्याचा विचार करत आहेत. आघाडीच्या ऑनलाइन व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइनने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यासाठी कंपनीने मंगळवारी भारतातील 2,266 प्रतिसादकर्त्यांवर आधारित त्यांचा हा नवीन कस्टमर रिसर्च जारी केला. लिंक्डइनच्या या रिसर्च मधून असे दिसून आले आहे की, 10 पैकी आठ (83 टक्के) काम करणाऱ्या महिलांना असे वाटले आहे की, त्यांना महामारीच्या प्रभावानंतर जास्त लवचिकपणे काम करायचे आहे.

70 टक्के लोकांनी आधीच नोकरी सोडली आहे
या रिसर्च मध्ये असेही म्हटले गेले आहे की, 72 टक्के नोकरदार महिला अशा नोकऱ्या नाकारत आहेत जिथे त्यांना लवचिकपणे काम करता येत नाही. तसेच, 70 टक्के महिलांनी आधीच नोकरी सोडली आहे किंवा सोडण्याचा विचार करत आहेत.

सर्वेक्षण केलेल्या दर पाच पैकी दोन महिलांनी सांगितले की, लवचिकता त्यांच्या काम आणि वैयक्तिक जीवनात चांगला समतोल राखते आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत करते. त्याच वेळी, दर तीनपैकी एकीने सांगितले की, यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य सुधारते आणि त्यांच्या सध्याच्या नोकऱ्यांमध्ये राहण्याची शक्यता वाढते.

लवचिक धोरणांची गरज
लिंक्डइनच्या इंडिया टॅलेंट अँड लर्निंग सोल्युशन्सच्या वरिष्ठ संचालक रुची आनंद म्हणाल्या, “हे कंपन्यांना आणि नियोक्ते यांना सतर्क करते की त्यांना त्यांची उच्च प्रतिभा गमावायची नसेल तर त्यांनी प्रभावी लवचिक धोरणे आणली पाहिजेत.”

लिंक्डइन ‘करिअर ब्रेक्स’ हे एक नवीन फिचर सादर करत आहे, जे सदस्यांना त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये करिअर ब्रेक जोडण्यास आणि त्या दरम्यानचे त्यांचे अनुभव प्रदर्शित करण्यास अनुमती देते. ते ज्या भूमिकेसाठी अर्ज करत आहेत त्यात करिअर ब्रेक दरम्यानचे अनुभव त्यांना कशी मदत करतात हे समजावून सांगण्यास सदस्य सक्षम असतील.

Leave a Comment