औरंगाबाद | स्मार्ट सिटी अंतर्गत एम एस आय या प्रकल्पामुळे संपूर्ण शहर कॅमेराच्या निगराणीखाली आले आहे. शहरात सर्व 115 वार्डात 418 ठिकाणी उच्च क्षमतेचे तब्बल 700 सिटी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटर मध्ये बसून 24 तास प्रत्येक भागावर लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. फोटो यासाठी पोलिसांची 14 जणांचे स्वतंत्र पथक तैनात केले आहे. ते कॅमेऱ्यामुळे मंगळसूत्र सोडणार यांसह इतर गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामात मदत होणार आहे.
स्मार्ट सिटी तून शहरात 178 कोटी रुपयांचा एमएसआय प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यात विविध कामांचा समावेश आहे. शहरात सातशे कॅमेरे बसवणे व त्याद्वारे सर्व हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणे हे यातीलच एक काम आहे. आता हे काम पूर्ण झाले आहे. स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली, माध्यम विश्लेषक अर्पिता शरद, कंत्राटदार एजन्सीचे प्रतिनिधी आशिष शर्मा तसेच कमांड अँड कंट्रोल सेंटरमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोंडेकर यांनी याविषयीची माहिती दिली. शहरातील 15 पोलीस ठाण्याकडून वर्दळीच्या ठिकाणांची यादी घेण्यात आली होती. त्याप्रमाणे शहरातील 418 जंक्शनवर सातशे कॅमेरे बसवण्यात आले.
सध्या पोलिस आयुक्त कार्यालयात 1 कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहे. तसेच एक सेंटर महापालिका मुख्यालयात उभारण्याचे काम सुरू आहे. शिवाय शहरातील पोलिस ठाण्यांमध्येही पोलीस व्हिविंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यांमधून त्यांच्या हद्दीतील घटनांवर नजर ठेवण्यात येत आहे. कमांड कंट्रोल सेंटरमध्ये कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपोआपच माहितीचे विश्लेषण ही केली जाते. जसे एखाद्या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली किंवा काही बेवारस वस्तू पडलेली असेल किंवा नो पार्किंग मध्ये कुठे गाडी पार्क केली असेल तर अशा वेळी कमांडेड कंट्रोल सेंटरच्या स्क्रीनवर आपोआप असा अलर्ट दिला जातो.