सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चढता आलेखाचे चालू वर्षातील रेकॉर्ड दररोज नवनविन विक्रम करत आहे. गुरुवारी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल ७४२ जण बाधित आले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये ७०३ जण बाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात कोणत्याही बाधितांचा मृत्यू झालेला नाही, ही चांगली बाब असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना बाधितांचे हळूहळू वाढू लागले आहेत. चालू आठवडाभरात नवनवीन रेकॉर्ड निर्माण होऊ लागले आहेत. गुरुवारी आलेल्या रिपोर्टमध्ये ७४२ हा नवा उंच्चाक आल्यानंतर शुक्रवारी आलेल्या रिपोर्टमध्ये ७०३ बाधित आले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा ६७, ५०८ झाला. तर जिल्ह्यात एकूण ६०,५७५ बरे झालेली रुग्णसंख्या आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १९१० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या जिल्ह्यात ४५१५ उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत. कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा