मुलांनो तयारीला लागा!! SSC अंतर्गत 73,333 पदांची भरती होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत तब्बल 73,333 जागांची मेगा भरती करण्याची तयारी सरकार करत आहे. केंद्र सरकारकडून विविध विभागांमधील गट डी पदांवर भरतीसाठी केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांचा तपशील आयोगाकडे पाठवण्यात आला आहे.

माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये सर्वाधिक 28,825 पदे रिक्त आहेत. यानंतर, दिल्ली पोलिसांमध्ये 7,550 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. रिक्त पदांचा अंतिम आकडा अद्याप जाहीर झाला नाही, त्यामुळे आता पदांची संख्या वाढू किंवा कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आयोग लवकरच या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करेल.

कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे सचिव गौतम कुमार यांनी 30 सप्टेंबर रोजी एसएससीचे अध्यक्ष आणि सर्व मंत्रालयांना पाठवलेल्या पत्रात 73,335 रिक्त पदे भरण्याची सूचना केली आहे. आयोगाने 2022 च्या कॅलेंडरच्या बहुतेक भरतींवर जाहिराती देखील जारी केल्या आहेत.

किती पदांची भरती केली जाणार –

1. कॉन्स्टेबल जीडी – 24,605 ​​पदे,
2. संयुक्त पदवी स्तर (CGL) – 20,814 पदे
3. कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह दिल्ली पोलिस – 6433 पदे
4. मल्टी टास्किंग स्टाफ – 4,682 पदे
5. उपनिरीक्षक केंद्रीय पोलीस संघटना – 4,300 पदे
6. एकत्रित उच्च माध्यमिक स्तर परीक्षा (CHSL) – 2,960 पदे