Thursday, March 23, 2023

EPFO मध्ये नॉमिनेशन करण्याचे फायदे समजून घ्या

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO कडून आता EPF सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय EPF खातेधारकांना यापुढे EPFO च्या कोणत्याही सुविधांचा लाभ घेता येणार नाही. हे लक्षात घ्या कि, कोणत्याही बचत योजनेच्या खात्यासाठी सदर खातेधारकाने नॉमिनी घोषित करणे आवश्यक आहे आणि तसे करणे फायदेशीर देखील आहे. यामुळे खातेदाराच्या मृत्यूनंतर, खातेदाराचे पैसे तो ज्याला देऊ इच्छित होता त्याला दिले जातात.

PF खातेदार आणि त्याच्या कुटुंबाला PF चे फायदे मिळवण्यासाठी ई-नॉमिनेशन खूप फायदेशीर आहे. हे लक्षात घ्या कि, जर एखाद्या PF ग्राहकाचा मृत्यू झाला तर ई-नॉमिनेशन केल्यावरच भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, विम्याचे फायदे ऑनलाइन क्लेम आणि सेटलमेंट करणे शक्य होते.

- Advertisement -

Provident Fund Alert: EPFO to Credit 8.5% EPF Interest Soon. Here's How To Check PF Balance

असे आहे नॉमिनी बनवण्याचे नियम

PF खातेदाराला फक्त त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नॉमिनी बनवता येईल हा नियम आहे. मात्र जर एखाद्याचे कुटुंब नसेल तर त्या प्रकरणात इतर कोणत्याही व्यक्तीला तो आपला नॉमिनी म्हणून घोषित करू शकतो. तसेच दुसऱ्याला नॉमिनी केल्यानंतर, कुटुंबाचा पत्ता माहीत झाल्यास आधी निमिनी बनवलेल्या व्यक्तीचे नॉमिनेशन रद्द होते. याचबरोबर जर एखाद्या कर्मचार्‍याने नॉमिनेशन केले नसेल आणि त्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या उत्तराधिकार्‍याला PF मिळवण्यासाठी उत्तराधिकार प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सिव्हिल कोर्टात जावे लागेल.

5.18 cr join formal workforce in 5 yrs, says EPFO data; Youth join in large numbers | NewsOnAIR -

एकापेक्षा जास्त नॉमिनी करू शकतात बनवता येतील

EPFO कडून पीएफ खातेधारकाला एकापेक्षा जास्त नॉमिनी घोषित करण्याची सुविधा देखील दिली जाते. यामध्ये जर एकापेक्षा जास्त नॉमिनी असेल जास्त नॉमिनेशन डिटेल्स द्यावे लागतील आणि कोणत्या नॉमिनीला किती रक्कम द्यावी लागेल हे स्पष्टपणे नमूद करावे लागेल.

ई-नॉमिनेशन का आवश्यक आहे ???

आता EPFO कडून PF खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र जर एखाद्याने ई-नॉमिनेशन केले नाही, तर त्याला आपला PF अकाउंट बॅलन्स आणि पासबुक पाहता येणार नाही. तसेच ई-नॉमिनेशन करताना संबंधित खातेधारकाकडे ऍक्टिव्ह UAN आणि मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.

EPF Account E Nomination: How to make nomination online in your EPF account

घरबसल्या अशा प्रकारे करा ई-नॉमिनेशन

EPFO च्या अधिकृत वेबसाइट http://epfindia.gov.in वर लॉग इन करा.
‘Services’ टॅबमध्ये, ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘for employees ‘ टॅबवर क्लिक करा.
आता तुमच्या UAN ने लॉग इन करा.
मॅनेज टॅब दिसेल. यामध्ये ई-नॉमिनेशन निवडा.
आता तुमचा कायमचा आणि सध्याचा पत्ता टाका.
फॅमिली डिक्लेरेशन बदलण्यासाठी ‘Yes’ निवडा.
नॉमिनी डिटेल्स एंटर करा आणि Save वर क्लिक करा.
आता ई-साइन चिन्हावर क्लिक करून पुढे जा.
तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मिळालेला OTP देखील भरा.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता नॉमिनेशन अपडेट केले जाईल.

हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून 184 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!
WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त