शहरातील विकासकामांसाठी 782 कोटी द्या; आयुक्तांची शासनाकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरात विविध विकास कामांचे 21 प्रकल्प महानगरपालिकेने हाती घेतले असून, सध्या 90 टक्के कामे पूर्ण होत आली आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्र, गरवारे स्टेडियमचा विकास, सातारा देवळाई आणि गुंठेवारी भागात ड्रेनेज लाईन या पाच मोठ्या विकासकामांसाठी 782 कोटी रुपयांची गरज आहे. या संदर्भात शासनाकडे आपण निधीची मागणी केली असल्याचे मनपा प्रशासन तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत काल जिल्हाधिकारी कार्यालयात मनपाच्या विकास प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मनपाकडून सुरू असलेल्या विकास कामांची माहिती देखील देण्यात आली. सध्या प्रगतीपथावर असलेली विविध 21 कामे आठ ते दहा महिन्यात पूर्ण होतील असा विश्‍वास यावेळी त्यांनी व्यक्त केला‌. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयासाठी 25 कोटी, स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्रासाठी 25 कोटी, गरवारे स्टेडियम येथे हॉकी व बास्केटबॉल साठी 50, कोटी सातारा देवळाई येथे ट्रेनिंगसाठी 32 कोटी, गुंठेवारी विभागातील ड्रेनेज लाईन साठी 150 कोटी असे एकूण 782 कोटी रुपये मनपाला द्यावेत अशी मागणी यावेळी मनपा प्रशासकांनी केली.

अतिरिक्त आयुक्त बि. बि. नेमाने, रविंद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा प्रमुख नंदकिशोर भोंबे, प्रभारी सहाय्यक संचालक नगर रचना जयंत खरवडकर, कार्यकारी अभियंता विद्युत देशमुख, मुख्य लेखाधिकारी संजय पवार, उपायुक्त अपर्णा थेटे, उद्यान अधीक्षक विजय पाटील आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment