हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 7th Pay Commission : आता काही दिवसांतच नवीन वर्ष सुरु होणार आहे. या येत्या वर्षांत केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खूप अपेक्षा आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सरकारकडे सॅलरीबाबत तीन प्रमुख मागण्या आहेत. जर नवीन वर्षांत सरकारने त्या मान्य केल्या तर त्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकेल.
हे लक्षात घ्या कि, केंद्र सरकारकडून दर वर्षीच्या सुरुवातीला आणि वर्षाच्या मध्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोनवेळा वाढ केली जाते. सहसा ते 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून लागू होईल असे मानले जाते. या बरोबरच DA ची थकबाकी आणि बेसिक सॅलरीमध्ये वाढ करण्याबाबतही कर्मचारी मागणी करत आहेत. 7th Pay Commission
महागाई भत्त्यात झाली 7 टक्क्यांनी वाढ
हे लक्षात घ्या कि, सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करून तो 38 टक्के केला गेला आहे. 1 जुलैपासून ही वाढ लागू होणार असल्याचे मानले जात होते. मात्र त्याआधी मार्चमध्येच याला मुदतवाढ देण्यात आली. त्यावेळी सरकारने 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत DA 3 टक्क्यांनी वाढवून 34 टक्के केला होता. 7th Pay Commission
नवीन वर्षात DA मध्ये ही वाढ होणार ???
नवीन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारकडून मार्च 2023 मध्ये DA आणि DR मध्ये 3 ते 5 टक्के वाढ केली जाऊ शकते. मात्र कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ जानेवारीपासून दिला जाणार आहे. जर आता सरकारकडून खरंच DA आणि DR 5 टक्क्यांनी वाढवला तर आता तो 43 टक्क्यांवर जाईल. 7th Pay Commission
फिटमेंट फॅक्टरमध्येही सुधारणा करण्याची मागणी
केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून फिटमेंट फॅक्टरमध्ये 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मिनिमम बेसिक सॅलरी 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपये होणार आहे. अशातच नवीन वर्षामध्ये जर कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी मान्य झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये मोठी वाढ होणार आहे.
18 महिन्यांच्या DA ची थकबाकी
हे लक्षात घ्या कि, कोरोनामुळे कर्मचाऱ्यांची जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतची 18 महिन्यांची DA थकबाकी पेंडिंग आहे. सरकारकडून दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये दोनदा DA मध्ये वाढ केली जाते, मात्र कोरोनामुळे या काळात सरकारने DA वाढवला नाही. ज्यामुळे आता त्यामध्ये देखील वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने केली जात आहे. 7th Pay Commission
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://doe.gov.in/seventh-cpc-pay-commission?page=1
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा