हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरी करत असेल किंवा तुम्ही स्वतः सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या DA थकबाकीचे पैसे देण्याची मागणी होत आहे. आता सरकारने यासाठी मंजुरी दिली असून एकूण आठ हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या खात्यात हे पैसे येतील
देशभरातील जवळपास 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मार्च 2023 मध्ये DA आणि DR जाहीर होण्याची शक्यता आहे. देशातील विविध राज्य सरकारांकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए आणि डीआरही जाहीर केले जात आहेत. आता तेलंगणा सरकारकडून थकबाकी डीए आणि डीआर बाबत घोषणा करण्यात आली आहे.
Business साठी 10 लाख रुपये मिळवा; मोदी सरकारची जबरदस्त स्कीम
इथे करा Apply-👉🏽 https://t.co/p2fL3DlhHx#Hellomaharashtra @narendramodi
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) January 29, 2023
तेलंगणा सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या DA मध्ये 2.73% वाढ केली आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा डीए 17.29 % वरून 20.2 % झाला आहे. 31 मे 2023 रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच शासनाकडून मिळणाऱ्या DA थकबाकीचा लाभ दिला जाईल. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 4.4 लाख कर्मचारी आणि 2.28 लाख पेन्शनधारकांना होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.