7th Pay Commission | सध्या भारतामध्ये लोकसभा निवडणुका चालू आहेत. आणि या निवडणुकांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. होळी पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांचा महागाई भत्ता हा 4 टक्क्यांनी वाढून 50 टक्केपर्यंत पोहोचला होता .यानंतर निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढवण्याची देखील घोषणा केली होती. डीए वाढ हा 1 जानेवारी 2024 पासून लागू झाला. आता केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उच्च भत्ता आणि वस्तीगृह अनुदानाची मर्यादा देखील वाढवलेली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता | 7th Pay Commission
कर्मचाऱ्यांच्या (7th Pay Commission) महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर आता केंद्र सरकारने त्यांच्या मुलांच्या शिक्षण भत्ता आणि वस्तीगृह अन्नदानाच्या मर्यादेबाबत सुधारणा केल्याचे जाहीर केलेले आहे. 2018 च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आता मंत्रालयाने म्हटले आहे की, या पगारातील महागाई भत्ता जेव्हा जेव्हा 50 टक्क्यांनी वाढतो, तेव्हा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण भत्ता आणि वस्तीगृह अनुदानाची मर्यादा देखील 25 टक्क्यांनी वाढणार आहे. असे त्यांनी आदेशामध्ये नमूद केलेले आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मुलांचा शिक्षण भत्ता आणि वस्तूगृहाच्या अनुदानाच्या रकमेबद्दल देखील सरकारने माहिती मागवलेली आहे.
शिक्षण भत्ता आणि वस्तीगृह अनुदान वाढवले
कार्मिक मंत्रालयाने जाहीर केलेल्या या आदेशानुसार आता मुलांच्या शिक्षण भत्त्याची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या वास्तविक खर्चाची परवाना करता दर महिन्याला 2812.5% आणि वस्तीगृह अनुदान हे 8437.5% प्रति महिना दिला जाईल. होळी पूर्वी केंद्र सरकारचे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता हा 46 टक्क्यावरून 50% पर्यंत केला होता. आणि याची बैठक नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली होती. या बैठकीत डीए वाढीचा निर्णय घेतला, असून 1 जानेवारी ते 30 जून 2024 पर्यंत कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ मिळेल असे देखील सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे किमती कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली होती.