अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
विज्ञानामुळे माणूस चंद्रावर पोहोचला मात्र दुर्गम भागातील माणसाला अजूनही त्याचा फायदा मिळालेला नाही याचा प्रत्यय आज पुन्हा आला आहे. मेळघाटातील आदिवासी बहुल भागात आजारपण दूर करण्यासाठी एका ८ महिन्यांच्या बाळाला मांत्रिकाच्या साहाय्याने पोटावर १०० चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.
अमरावती जिल्हयातील अतिदुर्गम भागात वसलेला आदिवासी समाज आज देखील आवश्यक आरोग्य सेवा पोहोचली नसल्याने अंधश्रद्धा जपतो आहे. हे पुन्हा एकदा उघड झालेलं आहे.अमरावती जिल्हयातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा या गावामध्ये जाणू सज्जू तोटा या महीलेच्या ८ महिन्याच्या बाळाला पोटफुगी झाल्यानंतर आई वडिलांनी बुवा भगत यांचा सल्ला घेतला. यावेळी सदर मांत्रिकाने बाळाला गरम विळ्याने १०० वेळा चटके दिल्यास त्याचा आजार दूर होईल असे सांगितले. त्यानंतर ८ महिन्यांच्या चिमुकल्याला पोटावर गरम विल्याचे १०० चटके देण्यात आले. मेळघाटातील भरारी पथकाला याची महिती मिळताच ८ महिन्याच्या श्यामला वैद्यकीय उपचारार्थ हलविले तर आई वडिलांना विचारणा केली असता हा प्रकार समोर आला. तर दुसरीकडे याच बुवा बाजीमुळे एका गर्भवती महिलेला देखील आपल्या प्राणाला मुकावे लागलं आहे. मेळघाट मध्ये कुपोषणाची मुख्य समस्या असतांना येथील आदिवासी अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला दिसतो आहे.
याला डंबा अस म्हणतात. अशा अनेक घटना आजसुद्धा मेळघाटात घडत असतात. शासनाची आरोग्य सुविधाच तिथे पोहोचलेली नसल्याने गावकरी शेवटचा पर्याय म्हणून मांत्रिकाचा सल्ला घेतात. यातून रुग्ण बरा होत नसला तरी त्याच्या नातेवाईकांना यातून आधार मिळतो. मात्र अनेकदा यात रुग्णांचा मृत्यू होतो. आजच्या या घटनेला सल्ला देणारा मांत्रिक जबाबदार कि सरकारी वैद्यकीय सुविधाच नसल्याने अंधश्रद्धांना बळी पडणारे आई वडील जबाबदार असा सवाल उपस्थित झाला आहे. कि मांत्रिक निर्माण होण्यास आणि वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यात अपयशी ठरलेले सरकार जबाबदार असा प्रश्न आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.