Satara News : कराड बाजार समिती निवडणूकीसाठी 18 जागांसाठी 80 उमेदवारांचे अर्ज दाखल

Karad Market Committee News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यातील नऊ शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस पार पडला. शेवटच्या दिवशी जास्त उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यामध्ये कराड शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 18 जागांसाठी 80 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर आज शेवटच्या दिवशी 56 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

काॅंग्रेसच्या काका- बाबा गटाच्या इच्छुक उमेदवारांसह डाॅ. अतुल भोसले, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याही समर्थकांनी अर्ज दाखल करत शक्ती प्रदर्शनही केले. राजकीय दृष्ठ्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कराड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 145 अर्जांची विक्री झाली. तर 18 जागांसाठी एकूण 80 अर्ज दाखल झाले आहेत.

कृषी पत व बहुउद्देशीय मतदार संघातून

सुनील प्रकाश पाटील (उंब्रज), उद्धव राजाराम जाधव (दुशेरे), संतोष पांडुरंग वेताळ (सुर्ली), वामन संताराम साळुंखे (किवळ), शैलेश उत्तमराव चव्हाण (कोपर्डे हवेली), सुभाष बाळकृष्ण पाटील (हेळगांव), उद्धवराव बाबुराव फाळके (पाल), दत्तात्रय बाळासो दळवी (पाल), मानसिंगराव वसंत जगदाळे (मसूर), शंकर बाळासो निकम (शेरे), जयवंत बबन मानकर (तळबीड), प्रल्हाद पांडुरंग काटकर (खोडशी), महेश प्रल्हाद काटकर (खोडशी), भिमराव हिंदुराव इंगवले (रिसवड), दयानंद भिमराव पाटील (काले), जयवंत पांडुरंग पाटील (कराड), अशोक गणपती कदम (वाघेरी), दत्तात्रय वसंतराव साळुंखे (चोरे), विनोद रमेश जाधव (उंब्रज), बंडा शिवाजी पोळ (शामगाव), तर यापूर्वी धनाजी दादासो थोरात, राहूल अमृतराव पवार, विजयकुमार सुभाष कदम, दिपक (प्रकाश) आकाराम पाटील (सुपने), प्रमोद बाळासो कणसे, अशोक बाबुराव पाटील, दिलीपराव दाजी पाटील,

महिला प्रवर्गातून

इंदिरा बाबासो जाधव- पाटील (उंब्रज), शहाबाई खाशाबा शिंदे (केसे), सुरेखा सुरेश देसाई (आणे), शिला मोहन डुबल (करवडी), मालन देवाप्पा पिसाळ (करवडी), विजयमाला रामचंद्र मोहिते, रेखाताई दिलीप पवार,

मागास प्रवर्गातून

मारुती पांडुरंग माळी (वडगाव हवेली), सर्जेराव रामचंद्र गुरव (तुळसण), संपतराव आण्णा माळी (बनवडी), अर्जुन जनार्दन कुंभार (वाठार), सपंत लक्ष्मण कुंभार, फिरोज अल्ली इनामदार

विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून

जयवंत बाळासो खरात (विरवडे), काशिनाथ विठ्ठल कारंडे (टाळगाव), मारुती आनंदा बुधे (कोपर्डे हवेली)

ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण

सुनिल प्रकाश पाटील (उंब्रज), सागर दिनकर पाटील (मुंढे), राजेंद्र रमेश चव्हाण (कालगाव), संभाजी लक्ष्मण चव्हाण (वारुंजी), संतोष पांडुरंग वेताळ (सुर्ली), प्रतापसिंह आनंदराव पाटील (शनिवार पेठ,कराड), मानसिंग आनंदराव पाटील (शनिवार पेठ,कराड), अभिजीत दिनकर मोरे (वाठार), विजय दिनकर चव्हाण (साजुर), विश्वासराव दादू निकम (साकुर्डी) प्रदीप रघुनाथ शिंदे (केसे), तुकाराम निवृत्ती डुबल (म्होप्रे)

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक

सागर दिनकर पाटील (मुंढे), तुषार बाजीराव पवार (वहागांव), अधिक एकनाथ पाटील (बाबरमाची), शंकर दिनकर इंगवले, आनंदराव भिमराव मोहिते,

व्यापारी आडते मतदार संघ

संतोष कृष्णत पाटील (बैल बाजार रोड, मलकापूर), राजेश रणजीत शहा (शनिवार पेठ, कराड), जगन्नाथ बळी लावंड, जयंतीलाल चतुरदास (मनुभाई) पटेल या 80 अर्ज दाखल केले.

हमाल मापारी मतदारसंघ 

गणपत आबासो पाटील (वसंतगड) ही जागा बिनविरोध झाली आहे.