व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वीटभट्टीवर मोठा स्फोट; 9 जण ठार तर 20 हून अधिक कामगार अडकले ढिगाऱ्याखाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका वीटभट्टीवर चिमटी मोठा स्फोट झाल्याची घटना पाटना – बिहारमधील मोतिहारीमध्ये आज पहाटेच्या सुमारास घडली. रामगढवा येथील नरिलगिरी परिसरात झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 हुन आधी कामगार अडकले आहेत. त्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामगढवा येथील नरिलगिरी परिसरात असलेल्या वीटभट्टीवर कामगार काम करत होते. यावेळी वीटभट्टीतील चिमणीच्या अचानक स्फोट झाला. यावेळी या स्फोटात 9 कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर 20 हुन अधिकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेत जखमी झालेल्या 16 जखमींना रक्सौलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी स्थानिक पोलीस आणि अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. जखमींची प्रकृतीही अत्यंत गंभीर असून एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. तसेच पथकाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले असून मृत्यू झालेल्यांमध्ये 4 स्थानिक आणि 3 जण उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.

पंतप्रधान मोदींकडून मदतीचे आश्वासन

वीटभट्टीवर घडलेल्या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसंच, मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत व जखमींना 50 हजार रुपये देण्यात येईल, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.