देशात आतापर्यंत लावले गेले लसीचे 95 कोटी डोस, मार्चपूर्वी पूर्ण होणार 1 बिलियनचा आकडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत देशातील 95 कोटी लोकांना कोरोनाच्या लसीचे (1 आणि 2) डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले, “जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू आहे. ज्याअंतर्गत आतापर्यंत 95 कोटीहून अधिक लोकांना कोरोना लस दिली गेली आहे. तसेच पुढे लिहिले आहे की, देश आता 100 कोटी लसीच्या डोसकडे वाटचाल करत आहे. 95 कोटीहून अधिक लोकांना लसीचे डोस मिळाल्यानंतर, अपेक्षित आहे की, भारत नियोजित वेळेपूर्वी 100 कोटी लसी डोसचे लक्ष्य गाठेल.

केंद्र सरकारने मार्च 2022 पर्यंत 100 कोटी लसीचे डोस देण्याचे लक्ष्य ठेवले होते, मात्र आता जे आकडे समोर आले आहेत ते पाहता असे म्हणता येईल की, हे लक्ष्य डिसेंबरपूर्वीच पूर्ण होईल. याआधी मांडवीया यांनी ‘लस मैत्री’ साठी ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये अतिरिक्त लस निर्यात करण्याबाबत सांगतले होते. ते म्हणाले होते की, “देशातील नागरिकांच्या गरजा आधी आहेत त्यानंतरच आम्ही निर्यात वाढवू.”

येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, देशात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची लोकसंख्या सुमारे 94 कोटी आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या दोन डोसनुसार, सर्व प्रौढांना लसीकरण करण्यासाठी 188 कोटी डोस आवश्यक आहेत. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी राज्यांना दररोज सरासरी 1.14 कोटी डोस द्यावे लागतील. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य सरकारांना जेवढे डोस लागू करायचे आहेत ते ते उपलब्ध करून दिले जातील. मात्र, डोसची उपलब्धता असूनही राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढत नाही. आतापर्यंत, देशातील 72 टक्के प्रौढ लोकसंख्येने एक डोस घेतला आहे आणि सुमारे 25 टक्के प्रौढ लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.

Leave a Comment