हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदाबाद शहरात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील शाहीबाग परिसरात एका 11 मजली इमारतीमधील सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शनिवारी आग लागल्याने यामध्ये एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तब्बल 25 मिनिटे बाल्कनीत अडकून असलेल्या मुलीने अखेर आपला जीव वाचवण्यासाठी लोकांकडे विनवणी केली. मात्र, तिला वाचवता आले नसल्याने तिचा तडफडून मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदाबाद येथील शाहीबागमध्ये गिरधर नगर सर्कलजवळ असलेल्या ऑर्किड ग्रीन इमारतीच्या फ्लॅटच्या सातव्या मजल्यावर अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच इमारतीतील लोकांची एकच खळबळ उडाली. लोकांनी इमारतीमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली.
इमारतीमध्ये 4 कुटूंबे राहत असल्याने त्यापैकी एका फ्लॅटमध्ये पाच जण होते. यावेळी चौघेजण बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र, त्यांच्यात असलेली 15 वर्षीय प्रांजल अडकून राहिली. तिने तात्काळ स्वताच्या बचावासाठी बाल्कनीच्या दिशेने धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. आग पुढे वाढत जाऊन तिच्यापर्यंत पोहचली. यावेळी तिने तब्बल 25 मिनिटे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. बाल्कनीतूनच तिने बाहेर उभ्या असलेल्या लोकांना वाचवण्याची विनंती केली. मात्र, आगीमध्ये होरपळून तिचा अखेर मृत्यू झाला.
अहमदाबादच्या शाहीबाग परिसरात 11 मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शनिवारी आग लागली यावेळी बाल्कनीत अडकलेल्या 15 वर्षीय मुलीचा तडफडून मृत्यू झाला. pic.twitter.com/p8xM3hQ05p
— santosh gurav (@santosh29590931) January 7, 2023
सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे अहमदाबाद शहर हादरून गेले आहे. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जेव्हा हि घटना घडली तेव्हा लिकांनी तात्काळ घटनेची माहिती अग्निशमन दलास दिली. माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या एका पथकाने 8 व्या मजल्यावर जाऊन मुलीला बाहेर काढले. यानंतर तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी 100 टक्के भाजलेल्या प्रांजलला मृत घोषित केले.