ऊसतोड मजुराच्या 17 वर्षीय मुलीवर बंद खोलीत 2 वर्ष बलात्कार; तुला नोकरी लावतो, लग्न करतो म्हणत..

pune rape case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीचं आमिष दाखवून ऊसतोड मजूराच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पीडित मुलगी ही मूळ बीडची असून कामानिमित्त पुण्यात आली होती. तुला नोकरीला लावतो, तुझ्याशी लग्न करतो अशा खोट्या भूलथापा देत तिच्यावर तब्बल २ वर्ष बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आरोपी संदीप किसन बडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

याबाबत फिर्यादी मुलीने केलेल्या आरोपानुसार, तिची आई 2017 पासून कामानिमित्त उत्तरप्रदेश येथे राहते त्यामुळे ती तिची मावशी शिला मुंजाजी तरकशे रा.चाकण, जि. पुणे यांच्या ओळखीने घरकाम शोधण्यासाठी चाकणला आली. चाकणमध्ये मावशी राहत असलेल्या परिसरात तिला घरकाम मिळाले. जवळपास वर्षभर तिने तिथे काम केले मात्र त्यांनतर तेवढ्या पैशात परवडत नसल्याने सदर पीडित तरुणीने तिची मोठी बहीण राजश्री शिंदे (रा. आढळगाव, ता. श्रीगोदा, जि. अहमदनगर) हिस काम शोधण्यास सांगितलं. तेव्हा तिने तिचा दूरवा नातेवाईक संदीप बडेकर याला चाकण बस स्टँडला पाठवले व तिला बस स्टॅण्डवर जाउन त्याला भेटायला सांगितले. तेव्हा आरोपी आणि पीडित मुलीची सर्वप्रथम ऑक्टोबर 2018 मध्ये पहिल्यांदा भेट झाली.

त्यावेळी सदर मुलीने संदीप बडेकर याला घरकाम शोधून देण्यास सांगितले, तेव्हा त्याने तिला त्याच्या गाडीत बसायला सांगितले व दोघे तळेगाव दाभाडे येथे काम शोधण्याकरिता गेले. तेथे एका बिल्डींगमधील एका रूममध्ये संदीप बडेकर याने पीडित मुलीला राहण्यास सांगितले. दोन दिवस ती एकटी तेथेच राहिले, . तिस-या दिवधी संदीप बडेकर हा दारू पिउन ती राहात असलेल्या खोलीत आला आणि शिवीगाळ करत तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. मुलीने त्याला विरोध करूनही त्याने जबरदस्तीने बलात्कार केला आणि त्याबाबत कोणाला सांगू नकोसे अशी दमदाटी केली. आसपास कोणीही ओळखीचे नसल्याने सदर मुलीने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही.

परंतु संदीप बडेकर याने घरकाम शोधून तर दिलेच नाही, उलट तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून दुस-या दिवशीही तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिला तळेगावमधील राहात असलेल्या रूममध्येच राहण्यास सांगितले. मुलीची आई कामानिमित्त उत्तरप्रदेशाला असल्याने आणि इतर नातेवाईक मूळ गावी राहात असल्याने ती तेथेच राहिली. यादरम्यान, ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2020 पर्यंत म्हणजे जवळपास २ वर्षांच्या कालावधीत संदीप बडेकर हा लग्न करतो असे सांगून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संभोग करीत होता. परंतु त्याने तिच्यासोबत लग्न केले नाही.

त्यांनतर सप्टेंबर 2020 मध्ये तिची विवाहित बहीण राजश्री शिंदे हिचे पती बाबासाहेब शिंदे हे मयत झाले. त्यानंतर पीडितेने काही दिवसांनी बहीण राजश्री शिंदे आणि आई मंगल कनकुटे या दोघींना तळेगावला राहात असलेल्या रूमवर फोन करून बोलावून घेतले आणि ती त्यांच्यासोबत श्रीगोंदा येथे राजश्री शिंदे हिच्या घरी गेली आणि त्यांनतर परळीला मावशीकडे राहायला गेली. त्यांनतर सदर पीडित मुलीने आरोपीवर कायदेशीर ऍक्शन घेतली. ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीत अल्पवयीन असताना बलात्कार केल्याप्रकरणी संदीप बडेकर याच्याविरूध्द तिने कायदेपीर तक्रार आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर कलम ३७६(२) (n), कलम ५०४, ५०६ , बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार, कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.