एका 47 वर्षांच्या शिक्षकाच्या प्रेमात वेडी झाली एक 19 वर्षीय मुलगी, प्रेमासाठी अभ्यासही सोडण्यास तयार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे, लोकं कित्येक महिने घरातच बंद होते. अशा परिस्थितीत, खाण्यापिण्याच्या प्रयोगांबरोबरच (Experiment with Food) त्यांनी नातेसंबंधांमध्येही अनेक प्रयोग केले. आता विचार करा की, वयाच्या 19 व्या वर्षी 47 वर्षांच्या माणसाच्या कोणी प्रेमात पडू शकेल का ? (Teenager fell in love with 47 year old man). या दोघांचीही सोशल मीडियावर वर्चुअली ओळख झाली आणि आता परीस्थिती अशी आहे की मुलगी तिच्या वडिलांच्या वयाच्या माणसाबरोबर राहण्यासाठी शिक्षणही सोडण्यास तयार आहे.

19 वर्षीय चार्लिन चाल्टिन 2020 मध्ये 47 वर्षीय जेरेमी प्रॅटिकोला भेटली. ते Twentyone Pilots Facebook या फेसबुक फॅन पेजवर भेटले. येथूनच त्यांच्या चॅटिंगची सुरूवात झाली आणि आता परिस्थिती आहे अशी की, चार्लिनला तिचा देश सोडून फक्त जेरेमीबरोबर राहण्यासाठी अमेरिकेत यायचे आहे. ती म्हणते की,” केवळ जेरेमीला तिच्या आयुष्यात प्राधान्य आहे. 28 वर्षांच्या प्रचंड अंतरानंतरही, हे कपल सध्या एकमेकांबद्दल गंभीर आहेत.”

A 19-year-old girl, who fell madly in love with a 47-year-old teacher, is  ready to leave her studies in search of romance. | Evening News

वयाची मर्यादा नाही, देशाचे बंधन नाही
जेरेमी प्रॅक्टिको हा अमेरिकेचा आहे. तो अमेरिकेतील वर्मोंट येथे राहतो, तर चार्लिन बेल्जियन आहे. ती बेल्जियमच्या ब्रसेल्समध्ये राहते. त्यांचा रोमान्स महामारीच्या वेळी सुरू झाला, तोही ऑनलाइन. जेरेमी प्राथमिक शाळेत शिक्षक आहे आणि एका फॅनपेजद्वारे शार्लीन त्याला भेटली. जेव्हा ते बोलू लागले तेव्हा अखंडितपणे गप्पा चालू राहिल्या. क्वारंटाईनमुळे या हटके प्रेमाला भरभराटीची भरपूर संधी दिली, कारण त्या वेळी दोघेही मोकळे होते. वर्चुअल डेटिंग आणि सततच्या चॅटिंग नंतर, त्यांनी 3500 मैल अंतरावरून एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. जेरेमी म्हणतो की,” तो त्याच्या वयापेक्षा कमी मॅच्युर आहे, तर चार्लीन तिच्या वयापेक्षा खूपच मॅच्युर आहे. यामुळेच त्यांची जोडी खूप जमली आहे.

प्रेमासाठी शिक्षण सोडेल
चार्लिन जेरेमीच्या प्रेमात इतकी वेडी झाली आहे की, ती म्हणते की, तिला जेरेमी कधीच तुच्यापेक्षा वयाने मोठा वाटत नाही. जेव्हा चार्लीनच्या आई -वडिलांना त्यांच्या या प्रेमाबद्दल कळले तेव्हा त्यांना वाटले की, चार्लीन हे सर्व फक्त ग्रीन कार्ड मिळवण्याच्या लालसेपोटी करत आहे. वर्षभराच्या नात्यात कोरोनामुळे, हे जोडपे एकमेकांना भेटू शकले नाहीत. नुकतेच, जेरेमी ब्रुसेल्समध्ये आल्यानंतर त्यांनी 8 दिवस एकत्र घालवले. आता चार्लीनला लवकरात लवकर जेरेमीसोबत अमेरिकेत शिफ्ट व्हायचे आहे. ती म्हणते की,” जेरेमीसोबत असणे ही तिची पहिली गरज आहे, ती दोन किंवा तीन वर्षानंतरही अभ्यास चालू ठेवू शकते.”