औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने फक्त संशयावरून एका 42 वर्षांच्या स्वयंघोषित वैद्याची हत्या (Murder) केली आहे. आरोपीने आजारी महिलेवर उपचार करायचे आहेत असे सांगत स्वयंघोषित वैद्याला मीटमिटा भागातील झुडुपात नेले आणि तिथेच त्याची हत्या (Murder) केली.
काही दिवसांपूर्वी घडली होती घटना
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील मिटमिटा भगात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास करण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांना हे प्रकरण सोडवण्यात यश आले आहे. त्याचबरोबर सदर हत्या (Murder) का झाली? या हत्येमागील नेमकं कारण काय आहे हे देखील समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपीने आपला गुन्हा मान्य केला असून आपण हत्या (Murder) का केली याची कबुली दिली आहे.कारभारी सिद्धू शेम्बडें असे या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव आहे तर सद्दाम सय्यद सिराज असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आरोपी सद्दाम हा व्यवसायासाठी औरंगाबदेतील वाळूज एमआयडीसीत स्थायिक झाला. त्याचं रांजणगाव परिसरात फर्निचर बनविण्याचं दुकान आहे. तर मृत कारभारी हे आरोपी सद्दाम याच्या सासुरवाडीत राहायचे. ते लोकांना औषधी द्यायचे, तसेच देवधर्माचं काम देखील करायचे. याचवेळी व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे कारभारी यांनीच जादुटोना केल्यामुळे आपला व्यवसाय ठप्प झाला असल्याचा संशय सद्दामला आला. यानंतर सद्दामने मृत कारभारी याच्या हत्येचा (Murder) कट रचला. त्याने कारभारी यांना कॉल केला आणि एका महिलेला मुलबाळ होत नाही, त्या महिलेला औषध पाहिजे, अशी थाप मारुन रांजणगाव येथे बोलावून घेतलं. यानंतर सद्दाम कारभारी यांना रेल्वेपटरीजवळ असलेल्या झुडूपात घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने दगड आणि फावड्याच्या दांड्याने बेदम मारहान करुन कारभारी याची हत्या (Murder) केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!