ड्रायव्हिंग टेस्ट दरम्यान 61 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – आजकाल लोकांना वाढत्या तणावामुळे मधुमेह, रक्तदाबाची व्याधी यांसारख्या अनेक आजारांनी ग्रासले आहे. यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्यांच्या संख्येतसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्येच नांदेडमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरटीओमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देताना एका 61 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

विठ्ठल तुळशीराम काळे असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विठ्ठल काळे ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आरटीओमध्ये गेले यावेळी टेस्टदरम्यान अचानक त्यांना हा झटका आला. यामुळे विठ्ठल तुळशीराम काळे यांच्या पत्नीला जबर धक्का बसला आहे. काळे हे प्रादेशिक परिवहन कार्यालयात चारचाकी वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देत होते. यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या टेस्टदरम्यान विठ्ठल तुळशीराम काळे यांच्या पत्नीदेखील त्यांच्या सोबत होत्या. टेस्टला गेले तेव्हा चांगले होते, आणि अचानक कर्मचाऱ्यांनी पतीच्या मृत्यूची बातमी सांगितल्यामुळे त्यांना जबर धक्का बसला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी जिममध्ये व्यायाम करीत असताना हृदयविकाराच्या झटक्याने असाच एका तरुणाचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment