धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर 70 वर्षीय वृद्धाचा बलात्कार

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आई-वडिल घरी नसताना एका दहा वर्षाच्या मुलीवर सत्तर वर्षाच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिसोळी या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडिती मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप निवृत्ती आडागळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि फिर्यादी यांची तोंडओळख आहे. ७ जून रोजी फिर्यादी आणि त्यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. या गोष्टीचा फायदा घेत आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस पैसे देऊन पिडीतेच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला.

यादरम्यान फिर्यादी घरी परतल्या असता, त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर त्यानी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने यापूर्वी देखील असा प्रकार वेळोवेळी केला असल्याचे पीडित मुलीकडून सांगण्यात आले. कोंढवा पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.