सातारा । सकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे धरणातील पाण्याची पातळी पाहण्यासाठी तेथील कर्मचारी गेले होते. पातळी पाहण्यासाठी लावलेल्या मोजपट्टीच्या शेजारी असलेल्या मोठ्या अँगलच्या शिडीवर त्यांना हा भलामोठा साप दिसला. त्यांनी तात्काळ ही गोष्ट वरिष्ठांना कळवली. वरिष्ठांनी कोयना वन्यजीव चे वनरक्षक अतुल खोत यांच्याशी संपर्क साधून साप असल्याचे कळवले. सर्पमित्र
विकास माने हे सहकारी अश्वजित जाधव यांच्यासह धरणाच्या भिंतीवरती पोहचले. अजगर हे धरणातील पाण्यात उतरण्यासाठी असलेल्या अंगलच्या शिडीवर बसले असल्यामुळे तिथे पोहचणे अवघड होते. खाली जायचं म्हणलं तर एका हाताने अँगल व दुसऱ्या हाताने अजगर पकडावे लागेल. पण अजगराने अशावेळी अँगलला पिळा घातल्यास त्याला एका हाताने काढणे जमणार नाही. व जरा तोल गेला तर आपण सरळ धरणाच्या पाण्यात पडू शकतो. त्यामुळे त्याला बाहेर कसं काढायचं याचा प्रश्न पढला होता.
पण त्याला सुखरूप पकडून जंगलात सोडणे महत्वाचे आहे. म्हणून सर्पमित्र विकास माने यांनी त्याला खाली जाऊन चिमट्याच्या साहायाने वर काढायचे ठरवले. माने यांनी खाली उतरून एका हाताने अँगल व दुसऱ्या हातात चिमट्याच्या साहाय्याने त्या अजगराला पकडले. पण अजगराने त्या अँगलला पिळा घातल्यामुळे व अजगराचे वजन जास्त असल्यामुळे त्याला वर काढणे अवघड होते. त्यामुळे सहकारी अश्वजित जाधव यांच्याकडे अजगर पकडलेला चिमटा देऊन माने यांनी अजगराचा पिळा काढून शेपटीच्या साहाय्याने वरती काढले. नंतर त्याला व्यवस्थित पकडून मोठ्या कापडी पिशवीत घालण्यात आले. अजगर हा साप निशाचर आहे त्यामुळे त्याला रात्री वनविभागाच्या अधिकार्यांसंवेत जंगलात सोडण्यात येणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’