Amazon आणि Flipkart वर ‘या’ दिवशी सुरू होणार बंपर सेल; स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या मागणीचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे या दरम्यान अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सेल सुरू करण्यात येतात. आता अमेझॉन आणि फ्लिपकार्टने देखील आपल्या मोठ्या सेलची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही सेल एकाच दिवशी सुरू होणार आहेत. अमेझॉनचा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ आणि फ्लिपकार्टचा ‘बिग बिलियन डेज’ असे दोन्ही सेल 8 ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे ॲमेझॉन प्राईम आणि फ्लिपकार्ट प्लस मेंबरना या सेलचा एक दिवस आधीच एक्सेस मिळणार आहे.

डिस्काउंट

फ्लिपकार्टवरील सेल हा येत्या 8 ते 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू असेल. तर ॲमेझॉनचा सेल देखील 8 ऑक्टोबरपासून सुरू होईल. मात्र, अजून सेलची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु हा असेल एक आठवड्यांचा असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरू होणाऱ्या या सेलमध्ये सर्वच कॅटेगरीवर मोठा डिस्काउंट देण्यात येणार आहे. ॲमेझॉनच्या सेलमध्ये SBI बँकेच्या कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. तर फ्लिपकार्टवर ICICI, Axis आणि Kotak या बँकांच्या कार्डवर 10 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

दोन्ही सेलमधल्या ऑफर्स

आपण जर ॲमेझॉनच्या या सेल मधील ऑफर्स पाहिला गेलो तर आपल्याला, अ‍ॅलन सोली, व्हॅन ह्युसेन आणि यूएसपीए अशा ब्रँड्सवर 84 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर, हार्पा, बिबा, मिस चेस अशा ब्रँड्सवर 86 टक्क्यांपर्यतचा डिस्काउंट देण्यात येईल. तसेच मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर देखील मोठी सूट असेल. फ्लिपकार्टवरच्या सेलमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक, वुमन्स वेअर आणि स्मार्टफोन अशा कॅटेगरीमध्ये 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. त्यामुळे हे दोन्ही सेल ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत.