शिवरायांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरुंविरोधात गुन्हा दाखल; शिवप्रेमींकडून संताप व्यक्त

shivray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका ख्रिश्चन धर्मगुरूंना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करणे चांगलेच अंगलटी आले आहेत. या धर्मगुरुंविरोधात गोव्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. बोलमेक्स परेरा असे या ख्रिश्चन धर्मगुरुचे नाव असून त्यांनी शिवाजी महाराजांकडे तुम्ही दैवत म्हणून कसे पाहू शकता असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गोवा वास्को पोलीस ठाण्याबाहेर बजरंग दल, राजपूत करणीसेनासह 100 पेक्षा जास्त शिवप्रेमींनी गोंधळ घातला आहे. यानंतरच या धर्मगुरुंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ही सर्व घटना घडली आहे. बोलमेक्स परेरा हे दक्षिण गोव्यातली सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स चर्चचे फादर आहेत. सोशल मीडियावर बोलमेक्स परेरा यांची एक व्हिडिओ क्लिप वायरल झाली आहे. यामध्येच परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दिसत आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये त्यांनी, “जर राष्ट्रपुरुष म्हणून तुम्ही शिवरायांकडे पाहात असाल तर त्याला दैवत कसं काय म्हणणार?” अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींकडून होताना दिसत आहे.

बोलमेक्स परेरा नेमकं काय म्हणाले?

काही लोक आहेत ज्यांच्यासाठी शिवाजी महाराज हे दैवत आहेत. मला वाटतं की शिवाजी महाराज हे राष्ट्रीय नायक आहेत आपण त्यांचा योग्य आदर आणि सन्मान केलाच पाहिजे. मात्र ते देव किंवा दैवत नाही. यासाठी हिंदू बांधवांशी संवाद साधला पाहिजे आणि शिवाजी तुमचा देव आहे की राष्ट्रीय नायकाच्या रुपात तुम्ही त्याला पाहता? हे विचारलं पाहिजे. जर राष्ट्रपुरुष म्हणून तुम्ही शिवरायांकडे पाहात असाल तर त्याला दैवत कसं काय म्हणणार?” असे वादग्रस्त वक्तव्य बोलमेक्स परेरा यांनी केले आहे.

बोलमेक्स परेरा यांच्या वक्तव्यानंतर परेरा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शिवप्रेमींनी गोव्याच्या पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी फादर परेरा यांच्यावर कारवाई केले. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वक्तव्य केल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. फादर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते असेही तक्रारीत म्हणले आहे.

यानंतर वास्को पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “फादर परेरा यांनी जाणीवपूर्वक आपल्या प्रवचनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट आहे. शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून धार्मिक भावना भडकवण्याचा हेतू फादर परेरा यांचा होता. छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहेत. आम्हा शिवप्रेमींच्या भावना या व्हिडीओमुळे दुखावल्या गेल्या आहेत” या तक्रारीनंतर बोलमेक्स परेरा यांच्या विरोधात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.