पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणणं भोवले; साताऱ्यातील युवकावर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करणं एका युवकास चांगलंच भोवल आहे. मंगळसूत्र चोर आमदारांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा अशा असायचा स्टेट्स आणि त्यावर पडळकरांचा फोटो लावल्याबाबत पुसेसावळी येथील युवकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुसेसावळी ता. खटाव येथील महेश उर्फ पप्पू बाळू कदम याने दिनांक ०१/१०/२०२२ रोजी गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या मोबाईल फोन च्या व्हाट्सअपला आमदार पडळकर यांचा जूना एका अनोळखी इसमा सोबत हातकडी घालून बसलेल्या फोटो मध्ये “ए चिंदीचोर कोण बोलतंय रे, पिंपरी आटपाडी चा पक्या म्हणलाय ना हे आपले भावी पंतप्रधान आहेत.” असे लिखित असलेल्या फोटो खाली “मंगळसूत्र चोर आमदारांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा” असे कॅप्शन देत यापुढे दोन चिकन लेगपीस ने टॅग करत स्टेट्स ठेवले .

त्यानंतर पुसेसावळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. अमोल पांडूरंग कदम आणि युवा नेते महेश आनंदराव पाटील यांनी सदर स्टेटसचे स्क्रिन शॉट काढून औंध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदरच्या घटनेबाबत संबंधित युवकावर औंध पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम ५०० अन्वये अदाखलपात्र गुन्हा रजिस्टर ला नोंद करण्यात आली असून मा.आमदार पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून यापुढेही संबंधित युवकावर आणखीन गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः अमोल कदम यांनी दिली आहे.